होमपेज › Goa › खंडणीप्रकरणी दोघांना अटक

खंडणीप्रकरणी दोघांना अटक

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 12:25AM

बुकमार्क करा

पर्वरी : वार्ताहर

सहीर अनास (वय 23,रा.केरळ)आणि दिलेशान महमद कुन्ही (वय 22,केरळ) या दोन संशयितांना पर्वरी पोलिसांनी खंडणी वसुली प्रकरणी मंगळवारी  रात्री 8.30 च्या दरम्यान शिताफीने  आसगाव येथे पकडले.  न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवस पोलिसाची  कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी रस्ता बांधकाम ठेकेदार अब्दुला चेरेकला यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली होती.   

सहीर अनास आणि दिलेशान महमद कुन्ही या संशयितांनी  1 डिसेंबर रोजी रस्ता बांधकाम ठेकेदार अब्दुला चेरेकला यांच्याकडे फोनवरून दहा लाख रुपयांची मागणी केली आणि पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

चेरेकला यांचे व्यवस्थापक उत्तम पालेकर यांनी त्याविषयी पर्वरी पोलिसात तक्रार दिली होती. दि.29 नोव्हेंबर रोजी चार अज्ञात व्यक्तींनी चेरेकला याला पर्वरी येथे रस्त्यात अडवून त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता.त्यावेळी झालेल्या  झटापटीत चेरेकला याने कशीबशी आपली सुटका करून घेतली होती.मात्र  चेरेकला यांच्या हाताला जबर  मार लागला होता.

या तक्रारीची दखल घेऊन पर्वरी पोलिसांनी मंगळवारी रात्री दोन्ही संशयितांना आसगाव  येथे शिताफीने अटक केली .संशयितांनी गुन्हा कबुल केला असून त्यांच्यावर पोलिसांनी भादविसं156,586 कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.  दोन्ही संशयितावर केरळातील पोलिस स्थानकात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.पर्वरी पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सगुण सावंत,पोलिस नितीन नाईक,नितीन गावकर,सागर खोर्जुवेकर,योगेश शिंदे,गणेश मातोंडकर यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.