Tue, Apr 23, 2019 19:37होमपेज › Goa › विधानसभा अधिवेशनात १७३३ प्रश्‍न, सात विधेयके : सभापती

विधानसभा अधिवेशनात १७३३ प्रश्‍न, सात विधेयके : सभापती

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 10 2018 1:01AMपणजी : प्रतिनिधी

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदारांनी 1733 प्रश्‍न सादर केले असून 12 दिवस चालणार्‍या अधिवेशनात सात सरकारी विधेयके मांडली जाणार असल्याची माहिती सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

येत्या 19 जुलै रोजी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. यासाठी आमदारांनी सोमवारपर्यंत तारांकीत 684 आणि अ-तारांकित 1049 प्रश्‍न पाठवले आहेत. विधानसभेत विचारावयाचे प्रश्‍न पाठवण्याचा मंगळवार (दि. 10) हा शेवटचा दिवस असल्याचे सभापती सावंत यांनी सांगितले. 

या अधिवेशनात लोकायुक्‍त कायद्यात दुरुस्ती, नगर नियोजन, पर्यावरण, भाडेकरूंची ओळख, आरोग्य आणि मोपा विमानतळ आदी विषयांवर विधेयके येणार आहेत. तसेच आणखी तीन सरकारी विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय ‘कॅग अहवाल’ही सादर केला जाणार आहे. अधिवेशन काळातील पहिले दोन दिवस अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. दहा दिवस अनुदानित मागण्यांवर चर्चा होणार असल्याचे सभापती सावंत यांनी सांगितले.