Tue, Jul 16, 2019 23:54होमपेज › Goa › ‘मे’मध्ये 13 अपघातांत 14 बळी

‘मे’मध्ये 13 अपघातांत 14 बळी

Published On: Jul 06 2018 1:31AM | Last Updated: Jul 05 2018 11:44PMपणजी : प्रतिनिधी

राज्यात  मे महिन्यात झालेल्या  13 जीवघेण्या अपघातांमध्ये 14 जणांना आपला जीव गमवावा लागला. यात उत्तर गोव्यातील 5 तर दक्षिण गोव्यातील 9 जणांचा समावेश असल्याची माहिती  वाहतूक खात्याने जारी केलेल्या  पत्रकाद्वारे दिली  आहे. याशिवाय  मे महिन्यात खात्याकडून वेगवेगळ्या वाहतूक नियम उल्‍लंघनासाठी 6 हजार 978 चलन  देण्यात आल्याचेही खात्याकडून   सांगण्यात आले. 

राज्यात  मे  महिन्यात एकूण  320 रस्ते अपघातांची नोंद झाली. यात 13 जीवघेणे अपघात (उत्तर गोव्यात 5 व दक्षिण गोव्यात 8), 16 गंभीर स्वरूपाचे (उत्तर गोव्यात 6 व दक्षिण गोव्यात  10), 86 किरकोळ स्वरूपाचे (उत्तर गोव्यात 25 व दक्षिण गोव्यात  61) तर  205  साध्या स्वरूपाच्या अपघातांची  (उत्तर गोव्यात 118 व दक्षिण गोव्यात 87) नोंद झाल्याची माहिती खात्याने दिली.रस्ता अपघातात जीव गमावणार्‍या बहुतेकांमध्ये दुचाकी चालकांचा समावेश आहे. अपघातात ठार होणार्‍यांमध्ये 9 चालक, एक सहप्रवासी, दोन प्रवासी  तर दोन पादचार्‍यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अपघातांमध्ये  37 जण गंभीर जखमी झाले (उत्तर गोव्यात12  व दक्षिण गोव्यात 25) तर 139 जणांना किरकोळ मार बसला. यात उत्तर गोव्यात 38  व दक्षिण गोव्यात  101 जणांचा समावेश असल्याचे खात्यातर्फे नमूद करण्यात आले.