Thu, Jul 18, 2019 06:43होमपेज › Goa › २०१७ मध्ये सर्पदंशाच्या ९६० घटना

२०१७ मध्ये सर्पदंशाच्या ९६० घटना

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 11:42PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील विविध इस्पितळ व आरोग्य केंद्रांमधील नोंदीनुसार 2017 या वर्षात एकूण सर्पदंशाच्या 960 घटना घडल्याची नोंद झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.

राज्यात  2015  मध्ये सर्पदंशाच्या 1 हजार 249 घटना आणि 2016 मध्ये 1 हजार 136 घटनांची नोंद झाली. सर्पदंशाच्या जास्त घटना या शेती परिसरात, घर परिसरामध्ये आणि पायवाटेवर घडल्याची नोंद आहे. 

आरोग्य खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार 2017 मध्ये म्हापसा येथील आझिलो इस्पितळ, चिखली  येथील कॉटेज इस्पितळ, मडगाव हॉस्पिसिओ व फोंडा उपजिल्हा इस्पितळात सर्पदंशाच्या 414 घटनांची नोंद  झाली. गोमेकॉ इस्पितळ व पणजी, म्हापसा, मडगाव या तीन शहरातील आरोग्य केंद्रांमधील नोंदीनुसार एकूण 286, वाळपई, पेडणे, कुडचडे व काणकोण या चार  नागरी आरोग्य केंद्रांतील नोंदीनुसार 126 आणि राज्यातील एकूण 23 प्राथमिक आरोग्य केंद्रातील नोंदीनुसार सर्पदंशांच्या 134  घटना घडल्या.

2015 मध्ये म्हापसा आझिलो इस्पितळ, चिखली  येथील कॉटेज इस्पितळ,  मडगाव हॉस्पिसिओ व फोंडा उपजिल्हा इस्पितळातील नोंदीनुसार सर्पदंशाच्या 514 घटनांची नोंद झाली. गोमेकॉ व पणजी, म्हापसा, मडगाव  या तीन शहरी आरोग्य केंद्रांत एकूण 371, वाळपई, पेडणे, कुडचडे व काणकोण या चार नागरी आरोग्य केंद्रांमध्ये 165 आणि राज्यातील एकूण 23 प्राथमिक आरोग्य केंद्रांत सर्पदंशांच्या 199 घटनांची नोंद झाली होती. 

2016 साली म्हापसा आझिलो इस्पितळ, चिखली येथील कॉटेज इस्पितळ, मडगाव हॉस्पिसिओ व फोंडा उपजिल्हा इस्पितळात सर्पदंशाच्या 473 घटनांची नोंद असून गोमेकॉ व पणजी, म्हापसा, मडगाव या तीन शहरी आरोग्य केंद्रांमध्ये एकूण 362, वाळपई, पेडणे, कुडचडे व काणकोण या चार नागरी आरोग्य केंद्रांत 147 आणि राज्यातील एकूण  23 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशांच्या 154 घटनांची नोंद झाली होती.