Thu, Feb 21, 2019 07:55होमपेज › Goa › इम्रान खानला बँक खात्यातून २५ लाख काढण्याची मुभा

इम्रान खानला बँक खात्यातून २५ लाख काढण्याची मुभा

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 24 2018 12:01AMपणजी : प्रतिनिधी

 खाण व्यावसायिक इम्रान खान याच्या गोठवण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांच्या बँक खात्यातून 25 लाख रुपये इतकी रक्‍कम काढण्यास मुभा द्यावी, असे निर्देश  पणजीच्या विशेष न्यायालयाने गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) मंगळवारी दिले.

खान याला काही महिन्यांपूर्वी एसआयटीने राज्यातील खाण घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. खाण व्यावसायिक असलेल्या खान  याच्यावर एसआयटीने माजी मुख्यमंत्री तथा खाण मंत्री दिगंबर कामत यांचा प्रॉक्सी असल्याचा ठपका ठेवला आहे. खान सध्या जामिनावर आहे. तपासा दरम्यान एआयटीने  खान याची खाती असलेल्या  बँकांना पत्र पाठवून त्याची सुमारे 100 कोटी  रक्‍कम असलेली बँक खाती गोठवण्याची विनंती केली होती.  

त्यानुसार त्याची ही बँक खाती गोठवण्यात आली होती. याला  खानने न्यायालयात आव्हान दिले होते.  त्यानुसार न्यायालयाने खान याच्या गोठविलेल्या  100 कोटी असलेल्या बँक खात्यातील 25 लाख काढण्याची मुभा देण्यासंबंधीचे निर्देश दिले.