Thu, Jun 27, 2019 17:43होमपेज › Goa › इफ्फी’चा आज होणार समारोप 

इफ्फी’चा आज होणार समारोप 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता दबंग सलमान खान यांच्या उपस्थितीत   डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता होणार्‍या रंगारंग सोहळ्यात इफ्फीचा समारोप होणार आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफ यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणार आहे. कॅनडाचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते एटम इगोयन यांना जीवनगौरव तर महानायक अमिताभ बच्चन यांना ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

समारोप सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हे नृत्य सादरीकरण करणार आहेत. समारोप सोहळ्यानंतर पाब्लो सिजर यांचा ‘थिंकिंग ऑफ हिम’ समारोपाचा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा 82 देशांतील 195 चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. त्यात 10 वर्ल्ड प्रीमियर, 10 आशियाई चित्रपटांचा प्रीमियर आणि 64  भारतीय प्रीमियरचा समावेश होता.

चित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरलेल्या 15 चित्रपटांपैकी सुवर्ण मयूर प्राप्त  चित्रपटाची घोषणा समारोप सोहळ्यात केली जाणार आहे. स्पर्धेत उतरलेल्या   चित्रपटांमध्ये‘कच्चा लिंबू’ या एका मराठी चित्रपटाचा देखील समावेश आहे. युनेस्को गांधी मेडल पुरस्कारासाठी 9 चित्रपटांमध्ये लढत झाली आहे. इफ्फीत नवोदित सर्वोकृष्ट सिने दिग्दर्शकाला पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.