Thu, Aug 22, 2019 08:24होमपेज › Goa › हृतिक रोशन, सुजान खान मुलाच्या वाढदिनी एकत्र

हृतिक रोशन, सुजान खान मुलाच्या वाढदिनी एकत्र

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मडगाव : प्रतिनिधी

बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनला दक्षिण गोव्याचे फार आकर्षण आहे. रोशन कुटुंबीयांचा प्रत्येक कौटुंबिक सोहळा दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात साजरा केला जातो. शनिवारी हृतिक व त्याची घटस्फोटित पत्नी सुजान खान मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आले. हृतिकने सुजानसमवेत  मुलाचा वाढदिवस सासष्टी तालुक्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा केला. यावेळी बॉलिवूडमधील काही मोजकीच मंडळी उपस्थित होती.

जिंदगी मिलेगी ना दोबारा या त्याच्या गाजलेल्या चित्रपटातील सेनोरीटा हे गाणे सुजानसमवेत गाऊन हृतिकने वाढदिवसाच्या पार्टीत रंग भरला. 2014 साली हृतिक आणि सुजान यांचा घटस्फोट झाला होता. मात्र मुलांच्या वाढदिनी हे दोघेही प्रत्येकवर्षी एकत्र येतात. इतकेच नव्हे तर वाढदिवसही उत्साहात साजरा करतात. शनिवारी हृधान याचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने  पंचतारांकित हॉटेलच्या हिरवळीवर साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या पार्टीला हृतिक रोशन आणि सुजान खान यांच्याबरोबरच  हृतिकची  जवळची मैत्रीण सोनाली बेंद्रे,जायेद खान, गोल्डी बेहल व इतर काही निकटवर्तीय मंडळी उपास्थित होती.

हॉटेलच्या हिरवळीवर खास गोमंतकीय डीजेला आमंत्रित करण्यात आले होते. संगीताच्या तालावर हृतिक रोशन यांनी गाणी सादर केली. गोमंतकीय कलाकार या वेळी उपस्थित होते. रोशन यांनी त्यांच्या जिंदगी मिलेगी ना दोबारा या प्रसिद्ध चित्रपटातील सेनोरीटा हे गाणे गाऊन पार्टीत रंगत आणली.


  •