Tue, Jul 23, 2019 16:42होमपेज › Goa › पिसुर्लेत ग्रामीण आरोग्य केंद्र उभारणार 

पिसुर्लेत ग्रामीण आरोग्य केंद्र उभारणार 

Published On: Dec 18 2017 2:30AM | Last Updated: Dec 18 2017 12:55AM

बुकमार्क करा

होंडा : वार्ताहर

लोकांना दर्जेदार आरोग्य  सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून पिसुर्ले येथे ग्रामीण आरोग्य केंद्र उभारले जाईल, असे आश्‍वासन आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी रविवारी पिसुर्ले पंचायत सभागृहात पिसुर्ले बॉईज क्लबच्या वर्धापनदिन कार्यक्रमात  दिले. मंत्री राणे  म्हणाले, सत्तरीच्या विकासासाठी आपण काही महिन्यांपूर्वी महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामे करणे, सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सत्तरी भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. सत्तरीतील मुख्यमार्गांच्या डांबरीकरणासाठी सरकारकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. अंगणवाड्या सुधारणा योजनेंतर्गत महिलांसाठी विशेष योजना सुरू केली जाईल.यासाठी सत्तरी तालुक्यातील सर्वांनी सहकार्य करावे. होंडा हे सत्तरी तालुक्याचे प्रवेशद्वार असल्याने लवकरच या परिसराचे सुशोभिकरण केले जाईल. यासाठी योजना आखण्यात आली असून यासाठी सुमारे दहा ते बारा कोटी रुपये खर्च अपेक्षीत असल्याचे विश्‍वजित राणे यांनी  सांगितले.
मंत्री  राणे यांच्या हस्ते   केक कापून पिसुर्ले बॉईज क्लबचा वर्धापनदिन साजरा केला. 

व्यासपीठावर होंडा जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती वाडकर, सरपंच जयश्री परब, उपसरपंच रूपेश गावडे, पंचायत सदस्य देवानंद परब, सगुण वाडकर, उल्हास गावडे, रोक्षिदास राणे, संगीता मोटे, विनोद शिंदे उपस्थित होते. क्लबतर्फे आयोजित करण्यात येणार्‍या पिसुर्ले क्रिकेट लीग स्पर्धेच्या जर्सी व  चषकाचे मंत्री राणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष देवानंद परब यांनी स्वागत केले. विलास  परब यांनी  सूत्रसंचालन केले. सिध्देश गावडे यांनी आभार मानले.