Thu, Jun 27, 2019 16:29होमपेज › Goa › गोवा धनगर समाज सेवा संघ वर्धापनदिनी विविध कार्यक्रम

गोवा धनगर समाज सेवा संघ वर्धापनदिनी विविध कार्यक्रम

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 27 2017 1:23AM

बुकमार्क करा
होंडा ः वार्ताहर

भुईपाल येथे गोवा धनगर समाज सेवा संघाच्या वर्धापनदिनी सत्तरी तालुक्यातील 62 गुणवंत विद्यार्थ्यांचा व 5 नूतन पंचायत सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संस्थेतर्फे यंदापासून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. मनोहर डोईफोडे यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. इयत्ता दहावी, बारावी व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन  गौरव करण्यात आला. यात अनिशा वरक, मंगल झोरे, संजय पिगळे, रेश्मा वरक, विजय शेळके, विवेक वरक, चैताली वरक, उद्देश पावणे, संजय पावणे, रविराज खरवत, सुरेखा हुमाणे, प्रणाली वरक, ज्योती वरक, सुरेखा झोरे, सविता झोरे, कविता झोरे, गंगी झोरे, रामनाथ झोरे, बाबलो शेळके, नागी वरक, दीप्ती पावणे, शांती ताटे, संगीता ताटे, सुजाता झोरे, सुगंधी काळे, सतिश झोरे, संदीप झोरे, रामा पाडारमिसे, शिवानी मोटे, योगिता खरवत, बिंदीया हुमाणे, संजय शेळके, सावी झोरे, सुषमा झोरे, सुप्रिया झोरे, गिता झोरे, दिपाली डोईफोडे, राजेंद्र वरक, यज्ञा बोडके, राजेंद्र झोरे, मनिषा वरक, मिलन ताटे, संगीता झोरे, स्नेहा ताटे, संदेश काळे, राहुल मोटे, दीप्ती खरवत, विजय हेडगे, निकिता वरक, सावित्री दवणे, गिता शेळके, रूपा झोरे, नयना वरक, मोहिनी काळे(वरक), ज्योस्ना खरवत, तुळशी हुमाणे, मनोज शेळके, जयंती वरक, अक्षदा शेळके यांचा समावेश होता.

क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुनील वरक, नवदीप पावणे, जयंती खरवत यांचाही गौरव करण्यात आला, त्याच प्रमाणे संस्थेच्या सहकार्याने न्यायालयीन लढाई लढून मागील वर्षीच्या कोट्यातून एमबीबीएस प्रवेश मिळवलेल्या पूनम झोरे हिचा गौरव करण्यात आला. पंचायत निवडणूकीत यश संपादन केलेल्या धनगर समाजातील पाच पंचायत सदस्यांमध्ये होंडा पचांयतीचे पंचायत सदस्य सया पावणे, पिसुर्लेच्या संगीता मोटे, नगरगाव पंचायत सदस्य रामा खरवत, म्हाऊस पंचायतीचे सोमनाथ काळे व सत्यवान हुमाणे यांचा समावेश होता. बारावी विज्ञान शाखेत 92.8 टक्के गुण मिळवून यंदा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्ष एमबीबीएसमध्ये प्रवेश घेतलेल्या शिवानी मोटे हिला शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. गौरव केलेल्या 63 विद्यार्थ्यांमध्ये 42 मुलींचा समावेश आहे.