कोळसा हाताळणी स्थगितीला उच्च न्यायालयाचा नकार 

Last Updated: Oct 11 2019 12:46AM
Responsive image

Responsive image

पणजी : प्रतिनिधी

वास्को येथे एमपीटीकडून केल्या जाणार्‍या कोळसा हाताळणीला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी नकार दिला.

कोळसा हाताळणीमुळे प्रदूषण होत असल्याने त्याला स्थगिती द्यावी, अशी मागणी करून गोवा फाऊंडेशन तसेच वास्कोच्या रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीच्यावेळी वास्को येथे एमपीटीकडून केल्या जाणार्‍या कोळसा हाताळणीला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. मात्र, त्याचबरोबर 20 नोव्हेंबरपर्यंतचे प्रदूषणासंदर्भातील नमुने गोळा करून त्याबाबतची माहिती सादर करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने एमपीटीला दिले आहेत. 

या याचिकेवरील पुढील सुनावणी 11 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. एमपीटीकडून केल्या जाणार्‍या या कोळसा हाताळणीमुळे प्रदूषण होते. एमपीटी कोळसा कंपन्यांना कसा फायदा होईल, यावर भर देत आहे. त्यांच्याकडून वास्कोत कोळसा कंपन्यांना प्रवेश देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. स्‍ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवा : धनंजय मुंडेंची मागणी


अमेरिकेमध्ये जाण्याचा ३२५ भारतीयांचा प्रयत्न फसला; मेक्सिकोतून पाठवले परत 


कोल्हापूर : ऋतुराज पाटलांच्या प्रचारासाठी ज्योतिरादित्य शिंदेंचा मराठीतून संवाद  


रंजन गोगोई यांच्‍या निवृत्तीनंतर मराठी माणूस होणार सरन्यायाधीश?


पीएमसी बँक खातेदारांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाही


KBC 11: ' १५ वर्षांची होते, तेव्हा ८ लोकांनी केला बलात्‍कार' ​​​​​​​


स्पृहाच्या या लुकमधील 'विक्की वेलिंगकर'चे नवे पोस्टर 


'या' हॉलिवूड अभिनेत्रीने ऋतिकचा उचलला नाही फोन 


कोल्‍हापूर : बनावट नोटांची छपाई; तिघांना अटक 


प्रफुल्ल पटेल चौकशीसाठी ईडीसमोर हजर