Wed, Nov 14, 2018 12:15होमपेज › Goa › हेमंत देसाईचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

हेमंत देसाईचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Published On: Mar 02 2018 12:48AM | Last Updated: Mar 02 2018 12:48AMकाकोडा : वार्ताहर

गाववाडा, शेळवण येथील सूर्यकांत देसाई याच्या मृत्यू प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या हेमंत देसाई याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. हेमंतला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

गुरुवारी संशयिताच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी होती. परंतु, न्यायालयाने संशयित आरोपीचा जामीन फेटाळला आहे. संशयिताला अद्याप अटक करण्यात न आल्याने सूर्यकांतच्या कुटुंबीयांनी गुरुवारी पुन्हा पोलिस ठाण्यासमोर धरणे धरले. मृत सूर्यकांतचे वडील व सासू आपल्या नातवंडांसमवेत पोलिस ठाण्यासमोर उन्हात बसले होते. संशयित आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. संशयिताच्या शोधासाठी पोलिसांनी अनेक गट तयार केले असून, सर्वत्र त्याचा शोध घेणे सुरू आहे.

गेल्या शुक्रवारी झालेल्या वादावादीत हेमंतने सूर्यकांतच्या डोक्यावर पिकासाने वार केला होता. त्यानंतर अतिरक्‍तस्रावामुळे सूर्यकांतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सूर्यकांतची काकी शेवंती हिला अटक करण्यात आली होती. तर मुख्य आरोपी हेमंत फरार झाला होता.