होमपेज › Goa › वाळपईत शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण

वाळपईत शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 11:52PMवाळपई : प्रतिनिधी

वाळपई परिसरात शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे काढलेल्या मिरवणुकीने  छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषात शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांच्या हस्ते सोमवारी थाटात  झाले.

वाळपईत छ. शिवाजी महाराज  पालिका उद्यानात 12 फूट उचींच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे लोकार्पण आरोग्यमंत्री तथा समितीचे अध्यक्ष विश्‍वजित राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सुरूवातीला विश्‍वजित राणे यांनी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण  करून  पुष्पहार अर्पण केला तसेच नामफलकाचे अनावरण केले. हनुमान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांंनी  सादर केलेल्या उत्स्फूर्त पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

व्यासपीठावर वाळपईच्या नगराध्यक्षा परवीन शेख, समितीचे स्वागताध्यक्ष  प्रेमनाथ हजारे,कार्याध्यक्ष अँड. यशवंत गावस, जि.प.सभासद फटी गावकर, ज्ञानेश्वर नाईक,  सरस्वती वाडकर, माजी आमदार नरहरी हळदणकर, अशोक परब, प्रमुख वक्‍ते गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल. सामंत, समितीचे उपाध्यक्ष उदयसिंह राणे, रामनाथ डांगी, निमंत्रक विनोद शिंदे, समितीचे पदाधिकारी सगुण वाडकर, विश्‍वासराव राणे, प्रसाद खाडीलकर, उदय सावंत, मिलिंद गाडगीळ, नगरगाव सरपंच पराग खाडीलकर, उसगाव सरपंच कु.अस्मिता गावडे, म्हाऊस सरपंच वदना गावस, केरी सरपंच लक्ष्मण गावस, पर्ये सरपंच आत्माराम शेट्ये, भिरोंडा सरपंच नितीन शिवडेकर, गुळेली सरपंच  अस्मिता मेळेकर, नगरसेवक अतुल दातये, रामदास शिरोडकर, रशिकांत च्यारी, अनिल काटकर, ओमप्रकाश बर्वे, आदी उपस्थित  होते

स्वागताध्यक्ष प्रेमनाथ हजारे यांनी  स्वागत केले.   उदय सावंत यांनी  प्रास्ताविक केले. मनिषा उसगावकर, मकरंद वेंलिगकर, कृष्णा नार्वेकर, रामराम राणे, प्रदीप गंवडळकर आदींनी मान्यवराना पुष्पगुच्छ प्रदान केली. सूत्रसंचालन मिंलिंद गाडगीळ यांनी केले तर शेवटी उदयसिंह राणे यांनी आभार मानले. सोमनाथ गावस,कृष्णा नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.