होमपेज › Goa › राज्यात दोन रुग्ण बरेे; एक नवा ‘पॉझिटिव्ह’ 

राज्यात दोन रुग्ण बरेे; एक नवा ‘पॉझिटिव्ह’ 

Last Updated: Jun 01 2020 1:48AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात रविवारी कोरोनाबाधित आणखीन दोन रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाचा आणखी एक नवा रुग्ण आढळून आला असून सदर महिला महाराष्ट्रातून सडकमार्गे गोव्यात दाखल झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 27 झाली आहे. राज्यात आतापर्यंतची रुग्णसंख्या 71 असून त्यापैकी 44 रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य खात्याकडून जारी केलेल्या अहवालामध्ये रविवारी देण्यात आली. रविवारी 1620 जणांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले. त्यातील 1227 नमुन्यांचा अहवाल मिळाला असून, त्यापैकी एक पॉझिटिव्ह आढळला.

राज्यात शनिवारी अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28 होती. त्यात, रविवारी दोन रुग्ण बरे झाल्याने आणि एक नवा कोरोनाबाधित रुग्ण सापडला असल्याने रविवारी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची 27 झाली. महाराष्ट्रातून सडकमार्गे गोव्यात दाखल झालेल्या एका महिलेचा चाचणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ 

आला असून तिला मडगावच्या ‘कोविड इस्पितळात’ भरती करण्यात आले आहे. राज्यात रविवारपर्यंत 2,255 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 1226 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 426 जणांचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे. राज्यात विविध सरकारी विलगीकरण केंद्रांत 292 लोकांना भरती करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली.