Fri, May 29, 2020 09:03होमपेज › Goa › ओखी चक्रीवादळ नुकसानग्रस्त व्यावसायिकांना भरपाई त्वरित द्या

ओखी चक्रीवादळ नुकसानग्रस्त व्यावसायिकांना भरपाई त्वरित द्या

Published On: Dec 09 2017 1:43AM | Last Updated: Dec 09 2017 1:11AM

बुकमार्क करा

हरमल  : वार्ताहर  

ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यात पेडणे तालुक्यातील समुद्र किनारपट्टीवरील   शॅक व्यावसायिकांना बरीच नुकसानी सोसावी लागली.  सरकारने नुकसान भरपाई देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.  मदत मिळाल्यास त्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास मदत होईल.  व्यावसायिकांना सरकारने  देऊं केलेली मदत  त्वरित उपलब्ध करावी, अशी मागणी  समाजकार्यकर्ते तथा उद्योजक सचिन परब यांनी प्रसिद्धी  पत्रकांतून केली आहे.   

  एका महिन्यापूर्वी पर्यटन   व्यवसायाला प्रारंभ झाला होता.शॅक उभारण्यासाठी अनेक व्यावसायिकांनी बँकाकडून कर्ज घेऊन  व्यवसाय उभारले. स्थानिक बेकार युवक   शॅक व्यवसायातून आपला रोजगार मिळवित  आहेत.त्यासाठी ज्यांची नुकसानी झाली त्यांना तात्काळ आर्थिक साहाय्य करून सरकारने मदतीचा हात द्यावा, असे परब यांनी म्हटले आहे.

ओखी चक्रीवादळामुळे काहीं मच्छिमार बांधवांनाही नुकसान पोहोचले आहे. किनारी भागात नांगरून ठेवलेल्या होड्या वादळी लाटांच्या तडाख्याने पाण्यात ओढल्या गेल्यानंतर एकमेकांवर आपटून  होड्यांची  नुकसानी  झाली. तसेच काहींची जाळीही फाटली आहेत.त्यामुळे सरकारने याची पाहणी करून त्यांनाही नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परब यांनी केली आहे.  

सरकाने कायदेशीर शॅक व्यवसायिकांसाठी तसेच मच्छीमार बांधवासाठी त्यांच्या सुरक्षेची हमी म्हणून खास आपत्कालीन विमा योजना राबवावी अशी  मागणी  परब यांनी   पत्रकातून केली आहे. पेडणे तालुक्याचा नुकसानीचा अहवाल सरकारला प्राप्त झाल्याचे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.त्यानुसार नुकसानग्रस्ताना तात्काळ आर्थिक साहाय्य उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली आहे.