Wed, Jul 17, 2019 20:43होमपेज › Goa › गोवा शिपयार्डतर्फे नौदलास इंधनवाहू बार्ज सुपूर्द

गोवा शिपयार्डतर्फे नौदलास इंधनवाहू बार्ज सुपूर्द

Published On: Aug 04 2018 1:32AM | Last Updated: Aug 03 2018 11:56PMदाबोळी : प्रतिनिधी 

गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतीय जहाज बांधणी उद्योगात इतिहास घडविताना भारतीय नौदलासाठी बांधण्यात आलेल्या एक हजार टन वजनाच्या चार इंधनवाहू बार्ज निर्धारित कालावधीपेक्षा पाच महिने अगोदरच नौदलाकडे सोपविल्या. चौथी व शेवटची इंधनवाहू बार्ज कर्नाटक नौदल विभागाचे कमांडर जी. श्यामसुंदर यांच्या उपस्थितीत नुकतीच हस्तांतरित करण्यात आली.

कारवार येथील नौदल तळावर झालेल्या एका सोहळ्यात कर्नाटक नौदल विभागाचे ध्वजाधिकारी रिअर अ‍ॅडमिरल के.जे.कुमार यांच्या उपस्थितीत या बार्ज नौदलाच्या ताफ्यात सामावून घेण्यात आल्या.भारतीय नौदलाला गेले काही वर्षे स्वयंगती इंधन देणार्‍या इंधन बार्जची कमतरता होती. विमानवाहू विक्रमादित्यासारख्या मोठ्या युध्दनौकांसाठी तसेच इतर युध्दनौकांसाठी एक हजार टनी स्वयंइधन गती  देणार्‍या बार्जची मोठी आवश्यकता होती. गोवा शिपयार्डने हे बार्ज बांधण्याचे आव्हान स्विकारुन ते लीलया पेलले. या बार्जमुळे समुद्रातून जाणार्‍या युध्दनौका व इतरांना सहजपणे इंधन पुरवठा करता येईल. 

चार इंधनवाहू बार्जेस बांधण्याच्या कामाला जून 2015 ला आरंभ झाला होता. त्यानंतर अवघ्या तीन वर्षाच्या कालावधीत त्या चारही बार्ज बांधण्याची कामगीरी गोवा शिपयार्डने केली. या बार्जची लांबी 68 मीटर असून अधिक वेग 14 सागरी मैल आहे. अत्याधुनिक अशा बार्जमध्ये रडार, इको साऊंडर डिजीपीएस आदींची सुविधा आहे.