Sun, Feb 17, 2019 05:00होमपेज › Goa › बारावीचा निकाल शनिवारी

बारावीचा निकाल शनिवारी

Published On: Apr 25 2018 2:37AM | Last Updated: Apr 25 2018 2:30AMपणजी : प्रतिनिधी

गोवा शिक्षण मंडळाने यंदा घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी (दि.28) सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात येणार असून  गुणपत्रिका 30 एप्रिल रोजी दिल्या जाणार आहेत. दहावीचा निकाल मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याचे गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी सांगितलेे.

बारावीच्या गुणपत्रिका तथा उत्तीर्ण प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना 30 एप्रिल पासून सकाळी 9.30 ते दुपारी 1 या वेळेत प्राप्त होणार आहेत. तिसवाडी, बार्देश, पेडणे, डिचोली, सत्तरी, फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यातील उच्च माध्यमिक शाळांनी पर्वरी येथील मंडळाच्या कार्यालयातून निकाल घ्यावे. तसेच दक्षिण गोव्यातील काणकोण, केपे, सांगे, सासष्टी आणि मुरगाव तालुक्यातील शाळांना मडगावच्या लोयेला शाळेतून निकाल मिळणार असल्याचे पत्रक मंडळाने काढले आहे. 

सोशल मीडियातून याआधी बारावीचा  निकाल दि.25 एप्रिल रोजी (बुधवारी) जाहीर होणार असल्याचे प्रसारित झाल्याने अनेकांनी मंडळाच्या आणि वर्तमानपत्रांच्या कार्यालयात  फोन करून विचारणा केली होती. यासंबंधी विचारणा केली असता सामंत म्हणाले की, बारावीचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर शनिवारी प्रसिद्ध केला जाणार असून लोकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. दहावीच्या निकालास आणखी काही वेळ जाण्याची शक्यता असून तो 20 मे नंतरच लागण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.

Tags : goa, goa news, HSC result, on Saturday,