Wed, Apr 24, 2019 22:01होमपेज › Goa › ग्रासियस यांच्यामुळे समाजसेवेची प्रेरणा : रवी नाईक 

ग्रासियस यांच्यामुळे समाजसेवेची प्रेरणा : रवी नाईक 

Published On: Feb 07 2018 1:37AM | Last Updated: Feb 07 2018 12:23AMफोंडा : प्रतिनिधी

समाजसेवक इनास ग्रासियस हे सच्चे समाजसेवक होते. युवा पिढीने  इनास ग्रासियस यांचा आदर्श आपल्यासमोर ठेवावा. त्यांच्यामुळे आपल्याला समाजसेवेची प्रेरणा मिळाली, असे  आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

बांदिवडे येथे ग्रासियस गार्डन सभागृहात इनास ग्रासियस ट्रस्टतर्फे आयोजित स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते. 

दरवर्षी  इनास ग्रासियस यांचे नातेवाईक व समाजातील सर्वस्तरातील  मंडळी एकत्र येऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा देतात व अशा प्रसंगी उपस्थित राहून सच्चा समाजसेवकाबद्दल आदर असून त्यांच्या कार्याचा वारसा त्यांच्या चाहत्यांनी पुढे नेण्याची गरज  आहेे. युवा पिढीने  इनास ग्रासियस यांचा आदर्श आपल्यासमोर ठेवावा. त्यांच्यामुळे आपल्याला समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळाली, असे रवी नाईक यांनी सांगितले.

बांदिवडे कवळे पंचायत क्षेत्रातील गुणवंत विद्याथ्यार्ंना मान्यवरांचे हस्ते शिष्यवृत्या देण्यात आल्या.  पहिल्या सत्रात घेतलेल्या समूहगीत स्पर्धेतील विजेते इंदिराबाई व्ही. भट ढवळीकर हायस्कूल ढवळी, शारदा इंग्लिश स्कूल माशेल, आल्मेदा हायस्कूल फोंडा व केंद्रीय विद्यालय फोंडा यांना अनुक्रमे बक्षिसे देण्यात आली. दुर्गाकुमार नावती व लक्ष्मण पालयेकर यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. डॉ. रॉक डिकॉस्ता यांनी स्वागत केले, फ्रँक फर्नांडिस यांनी प्रास्ताविक केले. सूत्रनिवेदन गिरीश वेळगेकर यांनी केले तर आभार सविता डिकॉस्ता यांनी मानले.