Thu, Oct 17, 2019 03:48होमपेज › Goa › ग्रामपंचायत सदस्यांना एप्रिलपासून वेतनवाढ

ग्रामपंचायत सदस्यांना एप्रिलपासून वेतनवाढ

Published On: Feb 07 2018 1:37AM | Last Updated: Feb 07 2018 12:20AMपणजी : प्रतिनिधी

ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या वेतनात एप्रिल महिन्यापासून वाढ करण्यात येणार असल्याची  माहिती पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. 

पंचायती राज मंत्रालय, पंचायत संचलनालयातर्फे ताळगाव येथील कम्युनिटी सेंटरच्या सभागृहात आयोजित पंचायत संमेलनाच्या  उद्घाटन सोहळ्यात मंत्री गुदिन्हो बोलत होते. मंत्री गुदिन्हो म्हणाले, केंद्र सरकारकडून पंचायतींसाठी थेट 27 कोटी रुपये निधी आला असून यातील फक्‍त साडेचार लाख रुपये सध्या वापरण्यात आले आहेत. उर्वरित निधी वापरला नाही तर तो रद्द केला जाईल. त्यामुळे  पंचायतीतून विविध योजना व उपक्रम राबविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची गरज आहे. परंतु यातही आळशीपणा  दिसून येत आहे.