Sat, Jul 20, 2019 10:39होमपेज › Goa › काँग्रेसला सरकार स्थापन्याची राज्यपालांनी संधी द्यावी

काँग्रेसला सरकार स्थापन्याची राज्यपालांनी संधी द्यावी

Published On: May 11 2018 1:36AM | Last Updated: May 11 2018 12:32AMपणजी : प्रतिनिधी  

भाजप युतीचे सरकार गोव्याला मुख्यमंत्री देऊ शकत नसेल तर घटनेतील तरतुदीनुसार राज्यपालांनी राज्यातील विरोधी पक्षाला अर्थात  काँग्रेसला सरकार स्थापन्याची संधी द्यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते रमाकांत खलप यांनी गुरुवारी काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. 

खलप म्हणाले, गोव्यात गेले तीन महिने मुख्यमंत्री नसणे हे खरे तर राज्याचे दुर्दैव आहे. ज्या पक्षाचे सरकार राज्यात आहे, ते भाजप युती सरकार मुख्यमंत्री देऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील युती सरकारने एक तर नवा मुख्यमंत्री नेमावा, अथवा  गोवा विधानसभेतील काँग्रेस हा सध्या सर्वात मोठा पक्ष असल्याने राज्यपालांनी काँग्रेसलाच सरकार स्थापन्याची संधी द्यावी.

मुख्यमंत्री  मनोहर  पर्रीकर यांनी आपल्या पदाचा ताबाही कुणाला दिला नसल्याचे सांगून राज्यात मुख्यमंत्री नसल्याने प्रशासन ठप्प झाल्याची टीकाही खलप यांनी केली. मुख्यमंत्री अनुपस्थित असतानाच राज्यात प्रादेशिक आराखडा, पीडीए आदी मुद्द्यांवरून गदारोळ माजला आहे. जनतेकडून आंदोलने केली जात असल्याने  प्रशासनही खिळखिळे झाले आहे, असेही खलप म्हणाले. सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस, सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा व काँग्रेसचे प्रवक्‍ते अ‍ॅड. यतिश नाईक उपस्थित होते.