Sun, Jul 21, 2019 12:45होमपेज › Goa › डिसेंबरपासून सरकारचा आर्थिक व्यवहार ‘डिजिटलाईज’ : पर्रीकर

डिसेंबरपासून सरकारचा आर्थिक व्यवहार ‘डिजिटलाईज’ : पर्रीकर

Published On: Jul 16 2018 1:24AM | Last Updated: Jul 15 2018 11:57PMपणजी : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ‘डिजिटल इंडिया’ संकल्पना प्रत्यक्षात आणणारे गोवा देशातील पहिले राज्य बनू शकते, असा विश्‍वास  आपल्याशी बोलताना व्यक्‍त केला होता. येत्या डिसेंबर-2018 पासून सरकारचा सर्व आर्थिक व्यवहार ‘डिजिटल’ माध्यमाद्वारे केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. 

राज्यात आयटी क्षेत्रात सरकारने आतापर्यंत म्हणावे असे प्रयत्न केले नसले तरी राज्यातील सुमारे 270 उद्योगांत 3000 आयटी व्यावसायिक काम करत असल्याचे समजल्यावर आपल्याला आश्‍चर्य वाटले. सरकारी खात्यात आपण डिजिटलायझेशन आणण्याचा 2012 साली प्रयत्न सुरू केला असून अनेक खात्यांतून राज्य सरकारने चेकद्वारे देयक देणे बंद केले होते. आतापर्यंत सरकारकडून देणे असलेल्यांना अनेक खात्यातून ‘ऑनलाईन’ देयक दिले जात आहे.  मात्र, येत्या डिसेंबरपासून सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन सुरू केला जाणार असल्याचे पर्रीकर  यांनी नमूद केले.