Sat, Nov 17, 2018 13:12होमपेज › Goa › गोमेकॉसह अन्य ४ सरकारी इस्पितळात पे पार्किंग

गोमेकॉसह अन्य ४ सरकारी इस्पितळात पे पार्किंग

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 25 2018 1:02AMपणजी : प्रतिनिधी

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ), आझिलो इस्पितळ- म्हापसा, उपजिल्हा इस्पितळ- साखळी आणि उपजिल्हा इस्पितळ- फोंडा या चार  सरकारी इस्पितळात पाटो- पणजी च्या धर्तीवर  ‘पे पार्किंग’ लागू केले जाणार आहे. यामुळे खासगी वाहनांना  चार तासांकरिता 10 रुपये तसेच दुचाकीला 4 रुपये आणि दिवसासाठी 20 रुपये या प्रमाणे  पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.

पार्किंग  शुल्क वसुलीसाठीचे कंत्राट देण्यासाठीची निविदा काढण्याबाबत इस्पितळ प्रशासनाकडून प्रयत्न  सुरू  आहे. बरेच  नागरिक खासगी वाहने गोमेकॉ परिसरात पार्क करून बसेसने दाबोळी विमानतळावर अथवा कार्यालयात जातात, असे  प्रकार इतर इस्पितळांतही आढळून आले आहेत. त्यासाठी येथे पार्किंग आवश्यक असल्याचे राणे यांनी सांगितले.  आरोग्य अवर सचिव तृप्ती मणेरकर यांनी गोमेकॉचे डीन आणि आरोग्य खात्याच्या संचालकांना दिलेल्या आदेशात बांबोळी येथील गोमेकॉ, आझिलो इस्पितळ- म्हापसा, उपजिल्हा इस्पितळ- साखळी आणि उपजिल्हा इस्पितळ- फोंडा या चार  इस्पितळांत खासगी वाहनांना शुल्क आकारण्याचे निर्देश दिले आहेत.