Sun, Jul 21, 2019 12:45होमपेज › Goa › अवयव प्रत्यारोपणासाठी गोमेकॉलाच मान्यता

अवयव प्रत्यारोपणासाठी गोमेकॉलाच मान्यता

Published On: Apr 21 2018 1:14AM | Last Updated: Apr 21 2018 1:14AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी गोमेकॉ हे एकमेव अधिकृत मान्यताप्राप्त इस्पितळ असेल. ‘मणिपाल इस्पितळा’ने अवयव प्रत्यारोपणासाठी मागितलेली परवानगी नाकारण्यात आली असून, आपण आरोग्यमंत्री असेेपर्यंत गोमेकॉ वगळता राज्यातील अन्य कोणत्याही इस्पितळाला अवयव प्रत्यारोपणास परवानगी दिली जाणार नाही. गोमंतकीयांच्या हितासाठी हा निर्णय  कायम राहील, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले. 

दोनापावला येथील मणिपाल  इस्पितळात  काही दिवसांपूर्वी एका ब्रेन डेड असलेल्या रुग्णाच्या अवयवांचे ‘हार्वेस्टींग’ करून मुंबईतील तीन रुग्णांवर त्यांचे प्रत्यारोपण करण्यात आले होते.  गोमेकॉत अवयव  प्रत्यारोपण करण्याची सोय नसल्याचे या प्रकरणाने उघड झाले असून आरोग्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन या प्रकरणी पाच सदस्यीय चौकशी नेमली आहे. शुक्रवारी याविषयी बोलताना राणे म्हणाले की, राज्याच्या हिताच्या दृष्टीने गोमेकॉशिवाय अन्य कोठेही अवयव प्रत्यारोपण सेवा सुरू होणार नाही. हा कठोर निर्णय घेतल्याशिवाय गोमेकॉची प्रगती होणे शक्य नाही. 

आरोग्य सचिवांच्या चौकशीचे आदेश

राज्याचे आरोग्य खात्याचे सचिव के. अशोक कुमार यांना मणिपाल इस्पितळाला अवयव प्रत्यारोपण सेवेला मंजुरी देण्याचा हक्‍क नाही. हा संपूर्ण बेकायदेशीर असा निर्णय असून या प्रकरणातील सचिव कुमार यांची भूमिकाही संशयास्पद असल्याने त्यांची चौकशी करण्याचा आदेश आपण दिला आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले.

 

Tags : Goa, Panaji news, Gomecalla, organ transplantation,