Sun, May 26, 2019 18:40होमपेज › Goa › पणजीतील ‘गोमेकॉ’ची जुनी इमारत वस्तुसंग्रहालयासाठी द्यावी : साल्ढाना

पणजीतील ‘गोमेकॉ’ची जुनी इमारत वस्तुसंग्रहालयासाठी द्यावी : साल्ढाना

Published On: Aug 02 2018 1:57AM | Last Updated: Aug 02 2018 1:45AMपणजी : प्रतिनिधी

पणजीतील ‘गोमेकॉ’ची जुनी इमारत वस्तुसंग्रहालयासाठी चांगली जागा आहे. येथील मनोरंजन संस्थेचे कार्यालय लवकरच दोनापावल येथे स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यानंतर ती इमारतीत वस्तुसंग्रहालयास कायमस्वरूपी द्यावी, अशी मागणी कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी केली. 

विधानसभेत वस्तुसंग्रहालयाच्या अनुदान मागणीवर साल्ढाणा म्हणाल्या, की ‘गोमेकॉ’ ची जुनी इमारत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे वस्तुसंग्रहालयासाठी ही मुख्य इमारतीची जागा योग्य ठरेल. थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर म्हणाले, की कोलवाळ ते थिवी या भागात तीन किल्ले आहेत. ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन दिवसासाठी वास्तव्य केले होते. हा इतिहास युवापिढीपर्यंत पोचायला हवा. सरकारने या इतिहासाचा अभ्यासक्रमात समावेश करावा.

पणजीतील जुन्या सचिवालयाची इमारतीच सरकारने जपणूक केली पाहिजे. गोवा विधानसभेचे पहिले सभागृह म्हणून भावी पिढीला याची माहिती मिळायला हवी. इमारतीच्या जतनासाठी सरकारने लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

एका संस्थेने माझ्यावर कासावली येथील 200 चौ.मी. जागेचे ‘नो डेव्हलोपमेंट झोन’ मध्ये  रुपांतर केल्याचा आरोप केला आहे. राज्यातील काही लोकांना पुराव्याशिवाय आरोप करायची सवय लागली आहे. केवळ नावाची बदनामी करण्यासाठी संस्थांकडून खोटे आरोप केले जात आहेत. प्रामाणिक व्यक्तींवर असा बिनबुडाचा आरोप करणार्‍यांविरोधात कारवाई व्हायला हवी. -एलिना साल्ढाणा, कुठ्ठाळीच्या आमदार