Thu, Jul 18, 2019 16:30होमपेज › Goa › गोव्याला जाताना रोकडची गरज नाही

गोव्याला जाताना रोकडची गरज नाही

Published On: Jan 31 2018 2:04AM | Last Updated: Jan 31 2018 2:04AMपणजी : पुढारी वृत्तसेवा

येत्या दिवाळीच्या सुट्टीत जीवाचा गोवा करायला जाताय? जात असाल, तर तुम्हाला रोकड खिशात बाळगण्याची काहीही गरज नाही. डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारेच गोव्यात सगळीकडे व्यवहार करता येतील. कारण, गोवा राज्य येत्या ऑक्टोबर महिन्यापासून संपूर्णपणे कॅशलेस होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही माहिती दिली. 

गोव्याच्या 100 टक्के डिजिटायझेशनचा तपशील 2018-19 च्या अर्थसंकल्पात देण्यात येईल, असे ते म्हणाले. हा अर्थसंकल्प पुढील महिन्यात विधिमंडळात सादर केला जाणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत गोवा देेशातील पहिले कॅशलेस राज्य असेल, तातडीची सेवा वगळता कोणतीही सरकारी देयक रोखीत स्वीकारली जाणार नाहीत, डिजिटल माध्यम आणि ई-माध्यमांसाठी सरकार पूर्णपणे तयारीत असल्याचे पर्रीकर म्हणाले.