Mon, May 20, 2019 08:41होमपेज › Goa › गोव्यात हाय अलर्ट; किनारपट्टीवर दहशतवादी उतरले? 

गोव्यात हाय अलर्ट; किनारपट्टीवर दहशतवादी उतरले? 

Published On: Apr 07 2018 10:52AM | Last Updated: Apr 07 2018 10:52AMपणजी: पुढारी ऑनलाईन

मच्छीमारांच्या बोटींतून काही दहशतवादी गोव्याच्या किनाऱ्यावर उतरल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीच्या आधारे गोवा सरकारने राज्यातील सर्व जहाज आणि कॅसिनो चालकांसाठी हा अलर्ट जारी केला आहे. 

गोव्याचे बंदर मंत्री जयेश साळगावकर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व कॅसिनो चालकांना, पाण्यातील खेळ आयोजित करणाऱ्या आणि मच्छीमारी करणाऱ्या बोटी चालकांना हा अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय तटरक्षक दलाने गुप्तचर यंत्रणेकडून आलेली माहिती दिल्यानंतर हा अलर्ट जारी करण्यात आल्याचे साळगावकर यांनी सांगितले. 

अलर्ट फक्त गोव्यासाठी नाही तर मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीला देखील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय मच्छीमारांची एक बोट पाकिस्तानने पकडली होती. ती बोट पाकने मुक्त केली असून त्यातून दहशतवादी आल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिल्याचे साळगावकर म्हणाले.

Tags: Goa, Terrorists, India, Alert