Tue, Apr 23, 2019 09:33होमपेज › Goa › गोव्याच्या स्मार्ट सिटी टीमची इंदूरला भेट

गोव्याच्या स्मार्ट सिटी टीमची इंदूरला भेट

Published On: Dec 17 2017 1:42AM | Last Updated: Dec 17 2017 1:18AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक पटकावलेल्या इंदूर शहराला (मध्यप्रदेश) गोव्याच्या स्मार्ट सिटी टीमने नुकतीच भेट दिली. इंदूर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडने हाती घेतलेला स्मार्ट सिटी प्रकल्प समजून घेण्यासाठी गोव्याची स्मार्ट सिटी टीम इंदूर भेटीवर आहे.  

पणजीचे माजी आमदार सिध्दार्थ कुंकळयेकर, नगरसेवक पुंडलिक राऊत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वयंदिप्त चौधरी यांचा या टीममध्ये सहभाग आहे. इंदूर येथील इंदूर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पदाधिकार्‍यांची त्यांनी भेट घेतली. 

इंदूर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडने गोपाळ मंदिर, राजवाडा इमारतीचे दुरुस्तीकाम काम हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे, इंदूर नगरपालिकेकडून दिवसातून तीन वेळा घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा गोळा करण्याचे काम केले जाते. नगरपलिकेच्या कर्मचार्‍यांचे सशक्तीकरण करण्यासारख्या उपक्रम गोव्यातील टीम समजून घेत आहे. इंदूर येथील ‘डीजिटल क्रिस्ट 2017’ मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीचा कायापालट कसा होत आहे, याचे सादरीकरणही करण्यात आले.