Sun, Mar 24, 2019 12:48होमपेज › Goa › काँग्रेसप्रमाणे भाजपकडूनही विश्‍वासघात 

काँग्रेसप्रमाणे भाजपकडूनही विश्‍वासघात 

Published On: Jun 10 2018 12:21AM | Last Updated: Jun 10 2018 12:06AMपाळी : वार्ताहर

गोव्यातील काँग्रेस व भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असून काँग्रेसप्रमाणे भाजपनेही जनतेचा विश्‍वासघात केल्याची टीका गोवा सुरक्षा मंचच्या केंद्रीय उपाध्यक्ष स्वाती केरकर यांनी केली. साखळीतील ओंकार भवन सभागृहात गोवा सुरक्षा मंचच्या साखळी मतदारसंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केरकर बोलत होत्या. केरकर पुढे म्हणाल्या की, काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष तत्वहिन पक्ष असून त्यांना योग्य पर्याय म्हणून गोवा सुरक्षा मंच या पक्षाची सर्वत्र संघटना मजबूत करण्यात येत आहे. केवळ राजकारण न करता  गोव्याची शैक्षणिक व सांस्कृतिक सुरक्षा अबाधित राखणे हे गोवा सुरक्षा मंचचे उद्दिष्ट असेल. राजकारणातील बजबजपुरीला कंटाळलेली जनता गोवा सुरक्षा मंचकडे आकर्षित होत आहे. यानंतर साखळी मतदारसंघात युवा वाहिनी समिती व महिला वाहिनी समिती ही लवकरच निवडण्यात येईल, असेही केरकर म्हणाल्या.  

यावेळी गोवा सुरक्षा मंच साखळी मतदारसंघ 27 सदस्यीय कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली. अध्यक्ष : भीमराव देसाई, उपाध्यक्ष- मनोहर सुर्लकर (सुर्ल), जगन्नाथ परब (कोठंबी-पाळी), सरचिटणीस - राजेंद्र आमेसकर (साखळी), सहसचिव- रामदास भगत (आमोणा), खजिनदार - कृष्णाजी देसाई (साखळी), कार्यकारिणी सदस्य - अनिल नाईक (कुडणे), अनंत आमोणकर (आमोणा), भानुदास सोननाईक. गोवा सुरक्षा मंचचे उत्तर गोवा उपाध्यक्ष दामोदर नाईक म्हणाले की, गोवा सुरक्षा मंचकडे निस्वार्थी, तात्विक व राष्ट्रीय विचारप्रणालीचे कार्यकर्ते आहेत. भाषा सुरक्षा मंच चा भाजपने विश्‍वासघात केल्याने भाषा सुरक्षा मंच चा ‘मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण’ हा विषय आता गोवा सुरक्षा मंच पुढे नेईल. म्हादईचा प्रश्‍न, खाण समस्या आदी विषय घेऊन गोवा सुरक्षा मंच लोकांसाठी आवाज उठवेल, असेही नाईक म्हणाले. साखळी गट युवा अध्यक्ष रुद्राक्ष शेटगावकर म्हणाले की, आजची युवा पिढी व्यसनाधिन झाली आहे. त्यांच्यासाठी जनजागृती कार्यक्रम युवा वाहिनी समितीतर्फे घेण्यात येईल. भीमराव देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले.