Thu, May 23, 2019 04:18होमपेज › Goa › राष्ट्रपती राजवटीची शिवसेनेची मागणी 

राष्ट्रपती राजवटीची शिवसेनेची मागणी 

Published On: Mar 14 2018 1:25AM | Last Updated: Mar 14 2018 1:11AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारांसाठी सध्या अमेरिकेत   असून राज्यात घटनात्मक पेच  निर्माण  झाला आहे. त्यामुळे  गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी गोवा राज्य शिवसेनेच्या प्रवक्त्या राखी प्रभूदेसाई नाईक यांनी  जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.

 राज्यातील खाणी  16 मार्चपासून बंद होणार असल्याने खाण अवलंबित आर्थिक संकटात सापडणार आहेत.  मात्र खाण अवलंबितांच्या हिता संदर्भात कोणी काहीच बोलत नाही. मुख्यमंत्री   मनोहर पर्रीकर उपचारासाठी परदेशात आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत इतर मंत्री खाणींचा प्रश्‍न सोडवण्यास असमर्थ असल्याचे दिसते.  या मंत्र्यांकडून दिल्‍लीत शिष्टंमडळ नेऊन  खाण प्रश्‍न सोडवण्याची केवळ खोटी आश्‍वासने दिली जात आहेत, असे.

राज्यातील विविध प्रश्‍न सोडवण्यास देखील  भाजप आघाडी सरकारला अपयश  आले आहे.त्यामुळे  गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करून खाण अवलंबितांना केंद्र सरकार मार्फत मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनेकडून  करण्यात येत आहे. खाणींच्या प्रश्‍नावरुन गोव्यात शिवसेनेची  भूमिका आक्रमक असल्याचे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.