Sat, Jan 19, 2019 10:27



होमपेज › Goa › ‘गोवा मॅरेथॉन’ ४ फेब्रुवारी रोजी : परेश कामत

‘गोवा मॅरेथॉन’ ४ फेब्रुवारी रोजी : परेश कामत

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 11:44PM



पणजी : प्रतिनिधी

अल शद्दाय चॅरिटेबल ट्रस्ट आणि गोवा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या सहकार्याने 4  फेब्रुवारी रोजी 7 व्या गोवा मॅरेथॉन 2018 चे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन मधून येणारा निधी  गरीब मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे, अशी माहिती गोवा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव परेश कामत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

परेश कामत म्हणाले,  ही ‘मॅरेथॉन’ स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ गोवा येथून सुरू होईल. मॅरेथॉन 21 किमी, 10 किमी ,5 किमी  तसेच 14 वर्ष व 16 वर्षांखालील शालेय विद्यार्थी, अशा श्रेणीत विभागण्यात आली आहे. गोव्यातून विविध क्‍लबचे सदस्य, माजी धावपटू, राज्याबाहेरील धावपटूही  मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. अल शद्दाय चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक मेथ्यु कुरिअन म्हणाले,मॅरेथॉनला कंपाल मैदानावरून सकाळी 6.30 वाजता सुरूवात होणार आहे. बायंगिणीपर्यंत व परत इतका 21 किमीचा पहिला टप्पा असेल.  

होबळे रेस्टॉरंट व परत इतका 10 किमीचा व 5 किमीचा  मांडवी हॉटेलकडून परत असा टप्पा असेल. मॅरेथॉनच्या बक्षीस वितरण सोहळ्याला गृह निर्माणमंत्री जयेश साळगावकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. विजेत्यांना  2 लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. गॉडफ्री मचाडो, आर. केंजल व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.