Tue, Jan 22, 2019 22:31होमपेज › Goa › गोव्यात सत्ताधारी आमदार आले अनवाणी

गोव्यात सत्ताधारी आमदार आले अनवाणी

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 20 2018 1:11AMपणजी : प्रतिनिधी

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनी चक्‍क अनवाणी सभागृहात प्रवेश केला होता. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजापणामुळे ही नवीन व्यवस्था करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अधिवेशनच्या गुरूवारच्या पहिल्या दिवशी भाजप आघाडी सरकारच्या सर्व मंत्री-आमदारांनी आपापले बूट वा चप्पल सभागृहाच्या बाहेर ठेवून आत प्रवेश केला. आजारी असलेल्या मुख्यमंत्र्यांना कोणताही संसर्ग होऊ नये, म्हणून ही काळजी घेण्यात आली होती.

पर्रीकरांशी काही महत्त्वाचे बोलण्यासाठी आलेले आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, क्रीडामंत्री मनोहर आजगावकर दोन हात लांब राहूनच बोलताना दिसले. स्वत: पर्रीकरांनी मात्र पायात काळ्या रंगाचे कापडी बूट घातले होते. मात्र, विरोधी आमदारांना या विषयी काहीही सूचना न आल्याने काँग्रेस आमदार बूट घालून सभागृहात वावरत होते.