होमपेज › Goa › आगामी निवडणुकीत गोवा फॉरवर्ड बलवान  

आगामी निवडणुकीत गोवा फॉरवर्ड बलवान  

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 03 2017 10:57PM

बुकमार्क करा


पणजी : प्रतिनिधी

गोवा फॉरवर्ड पक्षाचा तिसवाडी तालूक्यात दबदबा वाढवला जाणार आहे. गोमंतकीयाचे  प्रश्‍न हिरारीने  मांडणार्‍या ‘गोवा फॉरवर्ड’  पक्षाने  चार जागा लढवून तीन जिंकल्या.   आगामी विधानसभा निवडणुकीत   एक बलवान पक्ष म्हणून उतरणार आहे, असे मत  नगर नियोजन मंत्री तथा ‘गोवा फॉरवर्ड’ चे नेते विजय सरदेसाई यांनी मांडले. 

 ‘गोवा फॉरवर्ड’  पक्षात  हल्लीच प्रवेश घेतलेल्या  अतानसिओ (बाबूश) मोन्सेरात यांनी सांताक्रुज येथे आपले जुने कार्यालय  रविवारी मंत्री सरदेसाई यांच्याहस्ते नव्याने उद्घाटन करून सुरू केले. कार्यालयावर   ‘गोवा फॉरवर्ड’  पक्षाचे ‘नारळ’ चिन्ह व मोन्सेरात यांचे छायाचित्र   झळकत होते. या कार्यक्रमात  चिंबल पंचायतीच्या  पंचायत सदस्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचे मंत्री सरदेसाई यांनी पक्षाचे चिन्ह श्रीफळ देऊन स्वागत केले.

मोन्सेरात म्हणाले, की  आपण सांताक्रुज मतदारसंघाचे पाच वर्षे प्रतिनिधीत्व केले असले तरी विरोधक असल्याने विकासकामे करण्यास अडथळा येत असल्याचे नमूद केले. आता भाजप आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे आघडी सरकार असून आपल्या मतदारांना दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी गोवा फॉरवर्ड मध्ये सामील झालो आहे. 

गोवा फॉरवर्डचे सलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर, माजी आमदार  व्हीक्टर गोन्साल्विस, माजी खासदार  फॅरेल फुर्तादो यांच्यासहीत  अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.