Tue, Apr 23, 2019 01:39होमपेज › Goa › अग्‍निशमन दल कार्यतत्पर : मेनन

अग्‍निशमन दल कार्यतत्पर : मेनन

Published On: Feb 25 2018 1:27AM | Last Updated: Feb 25 2018 1:02AMपणजी : प्रतिनिधी

गोवा अग्‍निशमन दलाच्या जवानांनी  एप्रिल 2017 ते   जानेवारी  2018 या काळात  28. 87 कोटी रुपयांची   मालमत्ता वाचवली. अग्‍निशमन दल   नेहमीच कार्यतत्पर असते, असे मत अग्‍नि शमन दलाचे संचालक अशोक मेनन यांनी  दलाच्या 30व्या वार्षिक दिनी  पणजी येथील मुख्यालयाच्या  मैदानावर आयोजित कार्यक्रमात व्यक्‍त केले.  या कार्यक्रमाला  मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा प्रमुख  पाहुणे म्हणून  उपस्थित होते.   अग्‍निशमन दलाकडून  उत्कृष्ट काम केले जात आहे.  आपत्कालीन सेवा देण्यासाठी लागणारी आणि अग्‍निशमन सेवा प्रशिक्षणासाठी ग्रामपंचायतींमध्ये  ट्रेनिंग व्हॅन फायदेशीर ठरणार आहे. 2014 सालापासून 1553 नागरिकांना या व्हॅनच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले आहे. दलातर्फे 654 तरुणांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे यावेळी शर्मा यांनी सांगितले.

 मेनन म्हणाले,  एप्रिल 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत आग आणि आपत्कालीन 5896 घटनांमधून  . 117 लोकांना वाचवण्यात यश आले असून   549 प्राण्यांना जीवदान देण्यात आले आहे.
 यावेळी   दलातर्फे आयोजित विविध  स्पर्धांतील विजेत्यांना   पुरस्कार देण्यात आले. यात  वार्षिक स्क्‍विड ड्रिल  स्पर्धेत डिचोली फायर स्टेशनचे श्रीपाद गावस यांना  पहिला तर  द्वितीय क्रमांक कुंडई फायर स्टेशनमधील संतोष गावस यांना प्राप्त झाला. लॅडर ड्रिलमध्ये प्रथम क्रमांक मुख्यालयातील श्रीकृष्ण पर्रीकर तर द्वितीय क्रमांक वेर्णा फायर स्टेशनमधील राहुल देसाई यांना प्राप्त झाला. पंप  ड्रीलमध्ये प्रथम क्रमांक मुख्यालयातील श्रीकृष्ण पर्रीकर तर द्वितीय क्रमांक म्हापसा फायर स्टेशनमधील बॉस्को फेराव यांना मिळाला. रस्सीखेच स्पर्धेत   प्रथम क्रमांक फोंडा फायर स्टेशनमधील सुशील मोरजकर आणि द्वितीय क्रमांक वास्को फायर स्टेशनमधील दिलीप डिचोलीकर यांना मिळाला. 

क्रिकेटमध्ये सेंट्रल  झोनने बाजी मारली, यावेळी फायर फायटर गोकुळदास डेगवेकर यांनी बक्षीस स्वीकारले. तर उपविजेत्या नॉर्थ झोनचे नामदेव परवार यांनी बक्षीस स्विकारले. फुटबॉलमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस सेंट्रल झोनला मिळाले तर द्वितीय बक्षीस नॉर्थ झोनला प्राप्त झाले. व्हॉलिबॉल स्पर्धेत सेंट्रल झोनला प्रथम क्रमांक तर नॉर्थ झोनला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले.