Sun, Mar 24, 2019 08:16होमपेज › Goa › पणजीत काँग्रेसचा जल्लोष

पणजीत काँग्रेसचा जल्लोष

Published On: May 20 2018 1:41AM | Last Updated: May 20 2018 12:31AMपणजी : प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये भाजप सरकार कोसळल्याने काँग्रेस-जेडीएसला सरकार स्थापनेची संधी मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी प्रदेश काँग्रेसकडून शनिवारी पणजी येथील काँग्रेस भवन समोर फटाके उडवून  जल्‍लोष करण्यात आला.कर्नाटकमधील राजकीय घडमोडी  ऐतिहासिक  आहे, भाजपने गोव्यातील सरकारचा राजीनामा द्यावा, असे आवाहन काँग्रेस प्रवक्‍ते  अ‍ॅड. यतिश नाईक यांनी केले.

अ‍ॅड. नाईक म्हणाले, की कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध करण्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने भाजपचे सरकार कोसळले. कर्नाटकमध्ये भाजपने जनतेने दिलेल्या कौलाविरोधात सरकार स्थापन केले होते. भाजपला लोकशाहीचा आदर ठेवता येत नाही. भाजपकडे  कमी जागा असूनदेखील त्यांनी सरकार स्थापन केले होते. मात्र,कार्नटकमधील सध्याची राजकीय स्थिती म्हणजे लोकशाहीचा व कर्नाटक जनतेचा विजय असल्याचेही ते म्हणाले.काँग्रेस प्रवक्‍ते उर्फान मुल्‍ला, विजय भिके,  जनार्दन भंडारी व अन्य उपस्थित होते.