Sat, Feb 23, 2019 12:12होमपेज › Goa › मंत्री फ्रान्सिस डिसोझा उपचारांसाठी आज अमेरिकेला

मंत्री फ्रान्सिस डिसोझा उपचारांसाठी आज अमेरिकेला

Published On: Aug 20 2018 1:36AM | Last Updated: Aug 19 2018 11:54PMपणजी : प्रतिनिधी

नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा आपल्या आजारावर उपचार करून घेण्यासाठी रविवारी (दि.19) मुंबईला रवाना झाले. तेथून ते सोमवारी संध्याकाळी विमानाने अमेरिकेला जाणार असल्याचे सूत्रांनी 
सांगितले.

मंत्री डिसोझा यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला आपण उपचारासाठी एक महिना अमेरिकेला जात असल्याचे कळविले आहे. डिसोझा पत्नी व कुटुंबीयांसमवेत रविवारी मुंबईला पोहचले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मंत्री डिसोझा हे गेल्या काही वर्षांपासून आजारी असून ते नुकतेच विधानसभा अधिवेशनाच्या आधी काही दिवसांसाठी विदेशात उपचारासाठी गेले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या काळात सर्व भाजप मंत्री-आमदारांना विधानसभेत हजर राहण्यास सांगितल्याने ते तातडीने   राज्यात परतले होते. मात्र, डिसोझा अधिवेशनाच्या काळात राज्यात असूनही तब्येत बिघडल्याने अनुपस्थित राहिले होते. त्यांना त्या काळात मुंबईच्या लीलावती इस्पितळातही दाखल करण्यात आले होते.