Wed, Mar 20, 2019 08:30होमपेज › Goa › फोंड्यातील प्रलंबित कामे पूर्ण करणार

फोंड्यातील प्रलंबित कामे पूर्ण करणार

Published On: Apr 15 2018 1:34AM | Last Updated: Apr 14 2018 11:40PM
फोंडा : प्रतिनिधी

मागील पालिका मंडळात मगोचे 5 नगरसेवकांना पालिका मंडळाने सहकार्य केले नाही. त्यामुळे अनेक  कामे रखडली आहेत. पालिका निवडणुकीत मगोच्या रायझिंग फोंडा यश प्राप्त केल्यानंतर सर्व प्रलंबित कामे  त्वरित पूर्ण केली जातील, अशी  माहिती महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मागील पालिका मंडळाच्या अंतर्गत राजकारणामुळे अनेक कामे रखडली आहेत.   मगो निवडणुकीत सर्व जागा जिंकून विकास कामना प्राधान्य देणार आहे. निवडणुकीत मगो सर्व जागांवर विजय मिळविणार असल्याची खात्री प्रचारावेळी मतदारांकडून मिळत असल्याचे,  दीपक ढवळीकर यांनी सांगितले.पत्रकार परिषदेत डॉ केतन भाटीकर व सर्व उमेदवार उपस्थित होते. यावेळी मगोच्या बॅनरखाली रायझिंग फोंडा तर्फे निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराच्या नावाची घोषणा दीपक ढवळीकर यांनी केली. प्रभाग 1-रिया डांगी, प्रभाग 2-वीरेंद्र ढवळीकर, प्रभाग 3-यतिश सावकार, प्रभाग 4-सीता काकोडकर, प्रभाग 5-सुशांत कवळेकर, प्रभाग 6-मंगेश कुंडईकर, प्रभाग 7-अनिल कोरडे, प्रभाग 8-प्रदीप नाईक, प्रभाग 9-रीमा व्हिन्सेंट, प्रभाग 10-बिपीन सिरसाट, प्रभाग 11-अनिल उर्फ सुरज नाईक, प्रभाग 12-जया सावंत, प्रभाग 13 अमीना नाईक, प्रभाग 14-निधी मामलेकर,व प्रभाग 15 मधून गीताली तळवळीकर निवडणूक लढविणार आहे. 

Tags : Goa, Fulfilling, pending, tasks,  Ponda