Wed, Jul 17, 2019 18:25होमपेज › Goa › विद्यार्थी अपहरणप्रकरणी चौथा संशयित जेरबंद

विद्यार्थी अपहरणप्रकरणी चौथा संशयित जेरबंद

Published On: Dec 02 2017 12:25AM | Last Updated: Dec 02 2017 12:22AM

बुकमार्क करा

मडगाव ः प्रतिनिधी

खंडणी उकळण्यासाठी बुधवारी दुपारी उच्च माध्यमिक विद्यालयातील चार अल्पवयीन विद्यार्थ्यांचे अपहरण  केल्याप्रकरणी फरारी असलेला संशयित सद्दाम सय्यद (वय 20, रा. मनोरा राय) याला शुक्रवारी संध्याकाळी फातोर्डा पोलिसांनी झुवारीनगर-बिर्ला येथे अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरणप्रकरणी बुधवारी रात्री अटक केलेल्या तीन संशयितांनी दिलेल्या माहितीच्या आधारे  पोलिसांनी फरारी संशयिताला पकडण्यासाठी शुक्रवारी सापळा रचला होता. वास्को येथील झुुवारीनगर-बिर्ला या ठिकाणी संशयित सद्दाम सय्यद सापडला. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात अपहरण, खंडणीप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.   या प्रकरणात संशयित डेल्सन क्वाद्रोस, समीर शेख, जंगलीसाब वाळीकर या तिघा संशयितांना बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. खंडणी घेण्यासाठी आलेल्या डेल्सन याला पालकांनी बुधवारी संध्याकाळी शिताफीने पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. डेल्सनने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्य  दोघांना गुरुवारी पहाटे अटक केली होती.