Tue, Apr 23, 2019 20:06होमपेज › Goa › कामराभाट येथे संरक्षक भिंत कोसळून चार जखमी; बालक गंभीर

कामराभाट येथे संरक्षक भिंत कोसळून चार जखमी; बालक गंभीर

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 27 2018 12:13AMपणजी : प्रतिनिधी 

टोंक कामराभाट येथे मंगळवारी संध्याकाळी संरक्षक भिंत कोसळून   झालेल्या दुर्घटनेत चार जण जखमी झाले. यात  तीन मुले  व एका महिलेचा समावेश आहे. यापैकी एक बालक गंभीर जखमी झाले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामराभाट येथील संरक्षक भिंतीलगत खेळत असलेल्या मुलांवर भिंत पडल्याने ते यात जखमी झाले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित एक महिलाही जखमी झाली. मातीच्या ढिगार्‍याखाली हे सर्वजण दबले गेल्याचे समजताच  स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन  सर्वांना बाहेर काढले. तसेच या घटनेत   जखमी झालेल्या सर्वांना उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आलेे.