Sun, May 19, 2019 14:09
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › ‘ग्रेटर पणजी’ निर्णयासाठी चार सदस्यीय उपसमिती

‘ग्रेटर पणजी’ निर्णयासाठी चार सदस्यीय उपसमिती

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 19 2018 11:49PMपणजी : प्रतिनिधी

‘ग्रेटर पणजी पीडीए’ तून सांताक्रुझ आणि सांतआंद्रे भागातील पंचायत क्षेत्र वगळण्याबाबत मागणीवर निर्णय घेण्यासाठी चार सदस्यीय उपसमिती नेमण्यात आली असल्याची माहिती नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी दिली.

नगर नियोजन मंडळाची सोमवारी मंत्री सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक घेण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून   ‘ग्रेटर पणजी पीडीए’ तून सांताक्रुझ आणि सांतआंद्रे  परिसर वगळण्याच्या मागणीसाठी तेथील रहिवाशांनी आंदोलन चालविले होते.

तसेच कुडका- बांबोळी, मेरशी, चिंबल, शिरदोण, आगशी, सांताक्रुज आदी  ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा घेऊन त्यात ‘ग्रेटर पणजी पीडीए’ तून सांताक्रुज आणि सांतआंद्रे भाग वगळण्याचा ठराव मंजूर करून तो नगर नियोजन   खात्याकडे पाठवण्यात आला होता.  याविषयावर सोमवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली असता अध्यक्ष सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली मुख्य नगर नियोजन विकासक राजेश देसाई, सदस्य सचिव पंडिता तसेच आमदार फिलीप नेरी रॉड्रग्रीस या चार जणांची उपसमितीकडे निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला.  या उपसमितीची  बुधवारी बैठक होणार असून त्यात सर्व बाबींवर विचार केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.