Wed, Apr 24, 2019 16:31होमपेज › Goa › आयपीएल बेटिंग प्रकरणी पणजीत चौघांना अटक

आयपीएल बेटिंग प्रकरणी पणजीत चौघांना अटक

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:41AMपणजी : प्रतिनिधी

सध्या सुरू असलेल्या ‘आयपीएल’ क्रिकेट मॅचवर यंदाही गोव्यात बेटिंगचा प्रकार सुरू  असल्याचे आढळून आले आहे. गुन्हा  अन्वेषण विभागाने सांत इनेज-पणजी येथे शनिवारी रात्री उशिरा छापा टाकून चौघांना  बेटिंग घेताना रंगेहाथ पकडून अटक केली. सर्व संशयितांना नंतर जामिनावर मुक्‍त करण्यात  आले. 

गुन्हा अन्वेषण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार फ्रँकी फर्नांडिस, शबीर सईद, फिरोज इस्माईल खान, सनीफ शेख अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांंची नावे आहेत. या संशयितांकडून 12,690 रुपये  रोख, एक लॅपटॉप आणि  7  मोबाईल संचही जप्त करण्यात आले. आयपीएलमध्ये शनिवारी 

‘सनराईजर्स हैदराबाद’ व ‘दिल्ली डेअरडेविल्स’ यांच्यात झालेल्या रंगतदार सामन्यावर पणजीत सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना समजली. तांबडी माती- सांत इनेज येथील बंद खोलीत मोबाईलद्वारे सट्टा लावत होते.