Thu, Jun 20, 2019 01:06होमपेज › Goa › खाणी सुरू करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती आवश्यक : टी. व्हिक्टर

खाणी सुरू करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती आवश्यक : टी. व्हिक्टर

Published On: Jul 29 2018 1:21AM | Last Updated: Jul 28 2018 11:57PMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी दमण अ‍ॅण्ड दीव मायनिंग  कन्सेशन कायदा 1987 व एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती आवश्यक आहे. खाणींचा लिलाव हा खाण व्यवसाय सुरू करण्याचा पर्याय असू शकत नाही, असे मत भारतीय खाण अभियांत्रिकी संघटनेचे माजी अध्यक्ष टी. व्हिक्टर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केले. दोनापावल येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये भारतीय खाण अभियांत्रिक  संघटना व पॉलिटेक्निक मायनिंग अलुम्नी संघटना गोवा शाखेतर्फे आयोजित  खाण विषयक परिसंवादा निमित्ताने  ते बोलत होते.  

व्हिक्टर म्हणाले की,  राज्यातील खाण व्यवसाय बंद आहे. खाण व्यवसाय सुरु करण्यासाठी दमण अ‍ॅण्ड दीव मायनिंग  कन्सेशन कायदा  1987 व एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करणे हाच पर्याय आहे. अन्य पर्याय खाणी सुरु करण्यासाठी योग्य ठरणार नाहीत. कायद्यात दुरुस्ती केल्यास लीज नूतनीकरण मुदतीचा प्रश्‍न येणार नाही. खाण व्यवसाय पुन्हा सुरु होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी भारतीय खाण अभियांत्रिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष   अरुणकुमार कोठारी, गोवा शाखेचे   क्ेटस डिसोझा, पॉलिटेक्निक मायनिंग अलुम्नी संघटनेचे अध्यक्ष जोसफ कुएलो,  डॉ. वझे, महेश बोगाळे आदी उपस्थित होते.