Fri, Apr 26, 2019 15:19होमपेज › Goa › फोड्यातील बेशिस्त पार्किंगचा अडथळा दूर होणार

फोड्यातील बेशिस्त पार्किंगचा अडथळा दूर होणार

Published On: Dec 16 2017 1:41AM | Last Updated: Dec 15 2017 10:38PM

बुकमार्क करा

फोंडा ः वार्ताहर

फोंडा शहरातील बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न सध्या वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे विविध ठिकाणी खास पार्किंगची सोय करून रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांना व पादचार्‍याचा अडथळा दूर होण्याची शक्यता आहे. वरचा बाजारात बेशिस्त पार्किंगची समस्या कायम लोकांना सतावत होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी गेल्या बुधवारी रस्त्याच्या बाजूला दुचाकी पार्किंगसाठी खास जागा मापून  त्यावर सफेद पट्टे  रंगविण्यात आले आहे.  फुटपाथवरील विक्रेत्यांची रवानगी मार्केटात केल्याने सध्यातरी परिसरात अडथळा दूर झाला आहे. या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी व नियम भंग करणार्‍या वाहन चालकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी खास वाहतूक पोलिस शिपायांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वरचा बाजाराजवळ असलेल्या मार्केट संकुलनाच्या तळमजल्यावर इतर वाहने पार्क करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न तात्पुरता सुटलेला आहे. फोंडा वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीण गावस यांनी सांगितले, की  शहरातील बेशिस्त पार्किंगचा प्रश्‍न लवकरच सुटणार आहे. त्यासाठी सर्व प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. विविध ठिकाणी नामफलक लावण्यात येणार आहे. मात्र, वाहनचालकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.शहरात प्रवाशी घेण्याच्या नादात खासगी बसेस रस्त्यावर थांबवत असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यासाठी खासगी बस मालकांची बैठक घेवून त्यांना शहरात बस स्टॉप सोडून इतरत्र बस न थांबविण्याची ताकीद दिली आहे. खांडेपार पुलावर वाहने बंद पडल्याने अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खास क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.