Thu, Feb 21, 2019 15:15होमपेज › Goa › ‘बोंडला’तून पळालेले चार बिबटे ताब्यात

‘बोंडला’तून पळालेले चार बिबटे ताब्यात

Published On: Mar 04 2018 1:24AM | Last Updated: Mar 04 2018 1:16AMफोंडा : प्रतिनिधी

बोंडला येथील प्राणी संग्रहालयातील पिंजर्‍यात असलेले पाच बिबटे अज्ञातांनी कुलुपे तोडल्याने शुक्रवारी पहाटे पळून गेले. याप्रकरणी फोंडा पोलिस स्थानकात अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  संध्याकाळी उशिरापर्यंत 4 बिबट्यांना पकडण्यात यश आले. घटना घडली त्यावेळी तीन कामगार ड्युटीवर होते.  

प्राणी संग्रहालयाचे अधिकारी महानंद पर्येकर यांनी शनिवारी फोंडा पोलिस स्थानकात तक्रार दिली. उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक हरीश मडकईकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शुक्रवारी रात्री तीन कामगार प्राणी संग्रहालयात ड्युटीवर होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कामगारांना गेटची 4 कुलुपे  तोडलेल्या स्थितीत आढळली. त्यानंतर त्यांनी बिबट्यांचा शोध  घेतला असता पाचही बिबटे गायब झाल्याचे आढळून आले. 

शनिवारी दिवसभर वन खात्याचे अधिकारी व पोलिसांनी परिसरात तपासणी केली. त्यानंतर सायंकाळी चार बिबटे पकडण्यात त्यांना यश आले. या प्रकरणी फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, वन खात्याकडून शुक्रवारी रात्री ड्युटीवर असलेल्या कामगारांची चौकशी सुरु आहे.