Wed, Nov 21, 2018 16:08होमपेज › Goa › उत्तम प्रशासनासाठी कोणालाही पाठिंबा

उत्तम प्रशासनासाठी कोणालाही पाठिंबा

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:38AMफोंडा : प्रतिनिधी 

फोंडा पालिकेत चांगले प्रशासन देण्यासाठी फोंडा नागरिक प्रागतिक मंचाचे 3 नगरसेवक कोणत्याही गटाला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार असल्याची माहिती मंचचे अध्यक्ष रघुवीर देसाई यांनी मंगळवारी दुपारी घेतलेल्यापत्रकार परिषदेत दिली. 

मंचचे निवडून आलेले तिन्ही नगरसेवक संघटित आहेत. मात्र कुणीतरी अफवा पसरवीत असून त्यावर कुणीच विश्वास ठेवू नये,असे आवाहन रघुवीर देसाई यांनी केले.  फोंडा पालिकेच्या निवडणुकीत मंचांच्या उमेदवारांना सर्वाधिक 3450 मते प्राप्त झाली आहेत. पालिका मंडळ घडविण्यात मंचाच्या तिन्ही नगरसेवकांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार  असून मंच कोणत्याही गटाला पाठिंबा देण्यास तयार आहे. काहीजणांनी बाहेरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून प्रत्यक्षात अजून  यासंबंधी चर्चा झालेली नसल्याचे  देसाई यांनी सांगितले. 

कशोर नाईक यांनी सांगितले,की निवडणुकीवेळी काही जणांनी  मतदारांना आकर्षित करण्यासाठी पाण्याच्या टाक्या व पत्रे दिले. तसेच बेरोजगार युवकांना नोकर्‍यांची आमिषे दाखवली. त्यामुळे मंचाला कमी जागा मिळाल्या,असे असले तरी सर्वाधिक मते घेण्यात मंचाला यश आले आहे. मंचचे उपाध्यक्ष अशोक नाईक, किशोर नाईक, लक्ष्मण शिरोडकर व अरुण गुडेकर यावेळी उपस्थित होते.