Thu, Aug 22, 2019 12:29होमपेज › Goa › वेश्या व्यवसायप्रकरणी पाच युवतींची सुटका

वेश्या व्यवसायप्रकरणी पाच युवतींची सुटका

Published On: Apr 10 2018 1:16AM | Last Updated: Apr 10 2018 12:42AMम्हापसा ः प्रतिनिधी

बामणवाडा कांदोळी येथे कळंगुट पोलिसांनी वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून उझबेकिस्तानच्या तीन युवतींसह दोन भारतीय अशा एकूण पाच युवतींची सुटका केली. दोघा दलालांना अटक केली आहे. 
पोलिसांनी धनंजय कुमार मोहंती (वय 22) व चंदन कुमार पात्रा (27) या ओडिसाच्या संशयित दलालांना अटक करून त्यांच्याकडून सात मोबाईल व सव्वा लाख रूपये राकड हस्तगत केली. सुटका केलेल्या युवतींची रवानगी मेरशी येथील सुधारगृहात केली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली. दलाल युवतींना घेऊन एका गेस्ट हाऊसवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी लगेचच कारवाई करून पाच युवतींसह संशयित दलाल धनंजय कुमार मोहंती यास ताब्यात घेतले. त्यानंतर चंदन पात्रा यास कळंगुट सर्कलजवळ अटक केली.  पोलिसांनी याप्रकरणी धनंजय कुमार मोहंती व चंदन कुमार पात्रा यांच्यावर भा.दं. सं.च्या 370, 370(3) व वेश्या व्यवसाय प्रतिबंधक कायदा कलम 3, 4, 5 व 7 खाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक जीवबा दळवी तपास करीत आहेत. 
   
Tags :Five women, get rid of, prostitution business, goa news