Tue, Nov 20, 2018 22:07होमपेज › Goa › गांजा बाळगल्याप्रकरणी पाच अटकेत

गांजा बाळगल्याप्रकरणी पाच अटकेत

Published On: Jul 04 2018 2:12AM | Last Updated: Jul 03 2018 11:47PMमडगाव : प्रतिनिधी

पाजीफोंड, मडगाव येथे गांजा बाळगल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचा  542 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. मडगाव पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी पाजीफोंड येथे गांजा ओढला जात असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी संशयितांना रंगेहात पकडले. हरिश मदार (22, मालभाट), विशाल कानोजा (19, मडगाव), गौतम पवार (20, गांधी मार्केट), शुभम नाईक (22, मायणा कुडतरी) आणि चेतन नेडली (18, सिने लता) अशी संशयितांची नावे आहेत. पाचही जणांवर अंमली पदार्थ कायदा विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या कार्यकाळात गांजा प्रकरणाची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे.