Thu, Jun 20, 2019 00:33होमपेज › Goa › सहायक जेलरसह पाचजण निलंबित 

सहायक जेलरसह पाचजण निलंबित 

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 12:14AMपणजी : प्रतिनिधी 

कोलवाळ  मध्यवर्ती तुरुंगातील  भांग प्रकरणी तुरुंग महानिरीक्षकांनी   सहायक जेलर आणि चार जेलगार्डस्ना  सेवेतून निलंबित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये कोलवाळ मध्यवर्ती तुरुंगाचे सहायक जेलर शिवप्रसाद लोटलीकर, जेल गार्डस्  राजेंद्र वाडकर, कायतानो गुदिन्हो, विजय देसाई व किरण नाईक यांचा समावेश आहे. याबाबतचा आदेश  शुक्रवारी जारी करण्यात आला.  भांग प्रकरण बुधवारी महाशिवरात्री दिवशी घडले होते.

तुरुंगातील दोन  कैद्यांनी तसेच जेल गार्डना अन्य एका कैद्याने पेयातून भांग पिण्यास दिली होती. त्यानंतर या दोन्ही कैद्यांसह जेल गार्डची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.