होमपेज › Goa › इंटरनेटच्या माध्यमातून एकाला पाच लाखांचा गंडा

इंटरनेटच्या माध्यमातून एकाला पाच लाखांचा गंडा

Published On: Jun 10 2018 12:21AM | Last Updated: Jun 10 2018 12:18AMपणजी : प्रतिनिधी  

इंटरनेटच्या माध्यमातून विदेशातून साहित्य पुरवण्याचे आश्‍वासन देऊन पणजी येथील एका व्यक्‍तीला साडेपाच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर गुन्हे कक्षाकडे तक्रार नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  अमरजीत बरुआ (वय 24) असे तक्रारदाराचे नाव असून ते  पाटो पणजी येथील रिजॉयस इस्पात  प्रा. लि., या कंपनीचे संचालक आहेत. अ‍ॅमस्टरडॅम, नैदरलँड येथील नॅकींग नामक व्यक्‍तीने इंटरनेटच्या माध्यमातून बरुआ यांच्याकडे संपर्क साधून त्यांच्या कंपनीसाठी साहित्य पुरवण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर इंटरनेटव्दारेच झालेल्या करारानुसार नॅकींग यांनी बरुआ यांना या साहित्याच्या बदल्यात अ‍ॅमस्टरडॅम येथील आयएनजी बँकेच्या खात्यात 5 लाख 29 हजार 942 रुपये जमा करण्यास सांगितले. मात्र, पैसे जमा करुनदेखील ठरल्यावेळेनुसार साहित्याचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यानंतर बरुआ यांनी नॅकींग विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद माहिती व तंत्रज्ञान कायद्याखाली केली आहे. सायबर गुन्हे कक्षाचे पोलिस निरीक्षक राजेश जॉब पुढील तपास करीत आहेत.