Fri, Jul 19, 2019 15:42होमपेज › Goa › केरळमधील पूरग्रस्तांसाठी गोव्याची पाच कोटींची मदत

केरळमधील पूरग्रस्तांसाठी गोव्याची पाच कोटींची मदत

Published On: Aug 24 2018 12:42AM | Last Updated: Aug 24 2018 12:42AMपणजी : प्रतिनिधी

केरळ राज्यातील पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारतर्फे पाच कोटी रुपयांचा आर्थिक निधी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केले आहे. 

पर्रीकर बुधवारी अमेरिकेहून उपचार घेऊन राज्यात परतले असून त्यानंतर गुरुवारी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. केरळातील पुरात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी केरळ मुख्यमंत्री मदतनिधीसाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. केरळातील लोकांच्यासोबत गोवा ठामपणे आहे, असे मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर खात्यावर नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या तसेच महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी स्वेच्छेने एका दिवसाचे  वेतन केरळ पूरग्रस्तांसाठी द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री कार्यालयातून पाठवण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.