Fri, Jan 18, 2019 23:33होमपेज › Goa › १ जूनपासून मासेमारी बंदी  

१ जूनपासून मासेमारी बंदी  

Published On: May 11 2018 1:36AM | Last Updated: May 11 2018 12:12AMपणजी : प्रतिनिधी

मत्स्य उत्पादनात वाढ होण्यासाठी  येत्या 1 जून ते 31 जुलैपर्यंत 61 दिवसांची मासेमारी बंदी लागू होणार असल्याची अधिसूचना मत्स्योद्योग खात्याने गुरुवारी जारी केली. 

सदर अधिसूचनेत ‘गोवा, दमण अँड दीव मरिन फिशिंग रेग्युलेशन’ कायदा-1980च्या कलम 4 नुसार  मत्स्य उत्पादनाचे संवर्धन करण्यासाठी मासेमारी रोखण्याकरिता यांत्रिक पद्धतीने चालणार्‍या सर्व प्रकारच्या बोटी, ट्रॉलर्स आदींच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. फक्‍त नोंदणीकृत लहान होड्यांद्वारे 10 अश्‍वशक्‍तीपेक्षा कमी क्षमतेच्या  मोटरद्वारे राज्याच्या किनार्‍यालगत  मासेमारी करण्यास मुभा दिली आहे.