Wed, Aug 21, 2019 08:17



होमपेज › Goa › परराज्यांत जाणार्‍या मासळीवर शुल्क : मत्स्योद्योगमंत्री

परराज्यांत जाणार्‍या मासळीवर शुल्क : मत्स्योद्योगमंत्री

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





पणजी : प्रतिनिधी

गोमंतकीयांना मासळी स्वस्त दरात उपलब्ध करण्याच्या हेतूने कर्नाटक व अन्य शेजारी राज्यांत गोव्यातून होणार्‍या मासळी वाहतुकीवर लवकरच शुल्क आकारणी केली जाईल, असे मत्स्योद्योगमंत्री विनोद पालयेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गोव्यातील मासळी गोव्यातच राहिल्यास राज्यात  मासळीचा तुटवडा जाणवणार नाही, असे सांगून शुल्क आकारणीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असेही ते म्हणाले.

मंत्री पालयेकर म्हणाले, गोव्यात मासळीचे उत्पादन वाढावे, यासाठी मत्स्योद्योग खात्याकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. गोव्यातील मत्स्यसंपदा गोव्याबाहेर जास्त प्रमाणात जाऊ नये, यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. केंद्र सरकारने एलईडीद्वारे व बुल ट्रॉलिंगद्वारे होणार्‍या घातक मासेमारीवर बंदी लागू केली आहे. या बंदीची गोव्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे.